नागपूर, १४ फेब्रुवारी २०२३ : नागपूर शहरामध्ये एका दीड वर्षाच्या मुलीने मॉस्किटो किलरची बाटली तोंडात टाकल्याने तिचा मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी नागपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिद्धी दिनेश चौधरी असे मृत बालिकेचेचे नाव आहे. खेळता खेळता मॉस्किटो रिपेलंटची बाटली रिद्धीच्या हातामध्ये आली. तेव्हा तिने बाटलीला तोंडाने स्पर्श केला. यानंतर ती बेशुद्ध झाली.
रिद्धीची आई बेडरूममधून बाहेर आल्यावर तासाभरानंतर ही घटना उघडकीस आली. रिद्धीच्या वडिलांनी तातडीने रिद्धीला हॉस्पिटलमध्ये दाखल केले; मात्र दोन तासांतच रिद्धीचा मृत्यू झाला. सक्करदरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक धनंजय पाटील यांनी दिली.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड
