गोल पोस्ट Uncategorized भंडारा- वरठी महामार्गावर ट्रक आणि चारचाकीच्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू

भंडारा- वरठी महामार्गावर ट्रक आणि चारचाकीच्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू

भंडारा ७ ऑगस्ट २०२४ : भंडारा – वरठी राष्ट्रीय महामार्गावर दाभामोड परिसरात मध्यरात्री दरम्यान एका ट्रक व चारचाकी मध्ये भीषण अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की यात चारचाकी मधील एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चारचाकी मध्ये भूषण काळबांधे आणि रज्जाक पठाण दोघेही राहणार वरठी. हे वरठी कडून भंडाऱ्याच्या दिशेने चाललेले होते. दरम्यान भंडारा कडून येत असलेल्या एका ट्रकला चार चाकी ची भीषण धडक झाली. अपघात इतका भीषण होता की चारचाकीच्या समोरच्या भागाचा चेंदामेंदा होऊन भूषण कळवण याचा जागीच मृत्यू झाला तर रज्जाक पठाण हा गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

न्युज अनकट प्रतिनीधी : नितीन कुथे

error: Content is protected !!
Exit mobile version