गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे ओतूर पोलिसांनी केला दुचाकीचोर जेरबंद

ओतूर पोलिसांनी केला दुचाकीचोर जेरबंद

ओतूर, पुणे २ सप्टेंबर २०२३ : विनाक्रमांकाची दुचाकी घेऊन ओतूर पोलीस स्टेशन हद्दीत फिरणाऱ्या दुचाकीस्वारास ओतूर पोलिसांनी हटकले असता ती दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. याबाबत आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद असून त्याने ही दुचाकी चोरीची असल्याची कबुली दिली. गणेश एकनाथ चव्हाण रा.आळे, ता.जुन्नर असे या दुचाकी चोराचे नाव असून त्यास ओतूर पोलिसांनी जेरबंद केले आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे, पोलीस हवालदार नरेंद्र गोराने, पोलीस नाईक देवीदास खेडकर, जनार्दन सापटे यांनी ही कारवाई केली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version