गोल पोस्ट महाराष्ट्र कोल्हापूर शहरात कडकडीत बंद, ५०० हून अधिक पोलीसांचा फौजफाटा तैनात

कोल्हापूर शहरात कडकडीत बंद, ५०० हून अधिक पोलीसांचा फौजफाटा तैनात

कोल्हापूर, ५ सप्टेंबर २०२३ : जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर झालेला अमानुष लाठीमार आणि गोळीबाराच्या निषेधार्थ आज कोल्हापूर शहर बंद ठेवण्यात आले आहे. या बंदला कोल्हापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून शहरातील सर्व व्यवहार ठप्प आहेत. अनेक संघटना आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. ए.टी, केएमटी, रिक्षा, व्यापारी-व्यावसायिक आणि सर्व फेरीवाल्यांनी कडकडीत बंद पाळला आहे.

जालना येथील लाठीमाराच्या निषेधार्थ मराठा संघटनांनी आज कोल्हापूर बंदची हाक दिली होती. गृहमंत्र्यांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करत सकल मराठा समाजाने आज कोल्हापूरात कडकडीत बंद पाळला आहे. दसरा चौकात मराठा समाजाकडून निदर्शने करण्यात आली आहे. पोलिसांकडून ५०० हून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला असून स्वतः पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित आंदोलनस्थळी आहेत.

दरम्यान कोल्हापूर शहर बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील महापालिका कार्यक्षेत्रातील १८५ हून अधिक प्राथमिक शाळांना आज सुट्टी जाहीर केली आहे, तसे परिपत्रक महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांनी काढले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version