गोल पोस्ट महाराष्ट्र सोमवती यात्रेनिमित्त जेजुरी गडावर चार लाखांहून अधिक भाविकांची गर्दी

सोमवती यात्रेनिमित्त जेजुरी गडावर चार लाखांहून अधिक भाविकांची गर्दी

जेजुरी, १७ जुलै २०२३ : महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या श्री खंडोबा देवाच्या सोमवती यात्रे निमित्त, पहाटेपासूनच जेजुरी गडावर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. सोमवार अमावास्यादिवशी असलेल्या सोमवती यात्रेनिमित्त, आज दुपारी १ वाजता जेजुरी गडावरुन श्री खंडोबा देवाचा पालखी सोहळा निघाला. श्री खंडोबा व म्हाळसा देवीच्या उत्सव मृर्ती पालखीत ठेवताच लाखो भाविकांनी भंडाऱ्याची उधळण करुन ‘यळकोट यळकोट जय मल्हार’ चा जयघोष केला.

यावेळी संपूर्ण गड भंडाऱ्यानी न्हावून निघाला. ‘देवा तुझी सोन्याची जेजुरी’चा प्रत्यय भाविकांनी यावेळी अनुभवला. श्री खंडोबा देवाचा पालखी सोहळा कऱ्हा नदीला मार्गस्थ झाला असून संध्याकाळी ५ वाजता कऱ्हा नदीवर उत्सव मूर्तीना स्नान घातले जाणार आहे. या सोहळ्यासाठी सुमारे चार लाखांपेक्षा अधिक भाविक सहभागी झाले आहे. जेजुरी गडावर भक्तीचा महापूर पाहण्यास मिळत आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version