गोल पोस्ट महाराष्ट्र पानशेत धरण ओव्हर फ्लो होण्याची शक्यता- कार्यकारी अभियंता खडकवासला पाटबंधारे विभाग

पानशेत धरण ओव्हर फ्लो होण्याची शक्यता- कार्यकारी अभियंता खडकवासला पाटबंधारे विभाग

पुणे २७ जुलै २०२४ : पानशेत धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्यन्यवृष्टी होत असून पानशेत धरण जलाशय आज दिनांक २७ जुलै २०२४ रोजी सकाळी ५ वाजता ९० % टक्के क्षमतेने भरले आहे. धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण पाहता तसेच धरणात येवा वाढत गेल्यास परिस्थितीनुसार कधीही धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू होण्याची दाट शक्यता आहे.

तरी नदी काठच्या सर्व नागरीकांना याद्वारे सुचित करण्यात येते की, कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदी मधील शेती पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती दक्षता घ्यावी व पाटबंधारे विभागास सहकार्य करावे असे आवाहन कार्यकारी अभियंता खडकवासला पाटबंधारे विभाग, पुणे यांनी केलंय.

न्यूज अनकट प्रतिनिधी : जयश्री बोकील

error: Content is protected !!
Exit mobile version