गोल पोस्ट महाराष्ट्र सातारा शहरातील आढळला एका व्यक्तीचा अर्धवट जळालेला मृतदेह…

सातारा शहरातील आढळला एका व्यक्तीचा अर्धवट जळालेला मृतदेह…

सातारा, २० जानेवारी २०२४ : सातारा शहरातील राजवाडा परिसरात नगर वाचनाच्या शेजारी शनिवारी सकाळी सहा वाजता एका पुरुषाचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस तात्काळ दाखल झाले. मृत व्यक्तीचे नाव गोपाळ विजयकुमार लकीरे (रा. प्रतापगंज पेठ, सातारा) असून त्यांनी थंडीमुळे रात्री शेकोटी पेटवली होती आणि या शेकोटीमुळे त्यांचा जळून मृत्यू झाला असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे सातारा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना देण्यात आली असून नेमका मृत्यू कशामुळे झाला? याचा शहपूर पोलिसांकडून तपास केला जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ओंकार सोनावले

error: Content is protected !!
Exit mobile version