गोल पोस्ट महाराष्ट्र ४० लाख द्या आणि प्रश्नपत्रिका घ्या ! ‘पुण्यातील एमपीएसी’च्या विद्यार्थांना फोन

४० लाख द्या आणि प्रश्नपत्रिका घ्या ! ‘पुण्यातील एमपीएसी’च्या विद्यार्थांना फोन

३० जानेवारी २०२५ मुंबई : ४० लाख द्या आणि परीक्षेची प्रश्नपत्रिका घ्या. अस अमिष दाखवण्याचे प्रकार पुण्यात घडले आहे. एमपीएसची येत्या २ फेब्रुवारी पासून गट ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरू होत आहे. त्याच्या काही दिवसाआधी अमिष दाखवणारे फोन आल्याची धक्कादायक माहिती साम टीव्हीच्या हाती लागली आहे. सध्या त्याच्या दोन ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे जाणून घेऊया या बातमीतून

या ऑडिओ क्लिपमध्ये एक एजेंट विद्यार्थाशी बोलत आहे की, नमस्कार सर, मी रोहण कन्सल्टन्सी नागपूरमधून बोलत आहे. आपले बोलणे झाल्याप्रमाणे महाराष्ट्र गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024 येत्या 2 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या परीक्षेचे पेपर आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ त्यासाठी तुम्हाला व्हॉटसअप कॉलवर मीटिंग करावी लागेल. त्यानंतर ठरल्याप्रमाणे होईल, असे संभाषण झालेला एका महिलेचा कॉल एका विद्यार्थ्याला आला आहे.

पुढे त्याच विद्यार्थ्याला दूसरा कॉल येतो आणि त्यात आपण गट ब परीक्षेसाठी अर्ज केला आहे का जर आपण या पदाची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक खास ऑफर आहे. आम्ही तुम्हाला या परीक्षेची प्रश्नपत्रिका 2 फेब्रुवारीच्या आधी उपलब्ध करून देणार आहोत.त्याच्यासाठी तुम्हाला 40 लाख रुपये द्यावे लागतील. फक्त तुमचे ओरिजनल कागदपत्र जमा करावे लागतील. त्यानंतर मुख्य परीक्षेची प्रश्न पत्रिका दिली जाईल असे एका पुरुषाच्या आवाजातील कॉल रेकॉर्ड झाला आहे

यानंतर तुम्ही माझे मित्र तर नाही ना, की तुम्ही माझी मस्करी करताय अशी विद्यार्थ्याने संबंधीत परुषाला विचारपूस केली असता, मी तुमचं कोणताही मित्र नाहीये तुम्हाला नोकरी हवी असेल तर सांगा आपण पुढची प्रक्रिया करू असे पुढच्या व्यक्तीने म्हंटले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रथमेश पाटणकर

error: Content is protected !!
Exit mobile version