गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे ‘बंदी’ फक्त कागदावर! पिंपरी-चिंचवडमध्ये प्लास्टिक कॅरीबॅगचा ‘राजरोस’ वापर पालिकेची कारवाई अपयशी

‘बंदी’ फक्त कागदावर! पिंपरी-चिंचवडमध्ये प्लास्टिक कॅरीबॅगचा ‘राजरोस’ वापर पालिकेची कारवाई अपयशी

पिंपरी-चिंचवड शहरात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक कॅरीबॅगवर राज्य शासनाने काही वर्षांपूर्वी बंदी घालली होती. मात्र, शहरात ही बंदी फक्त कागदोपत्री राहिली आहे. बाजारपेठा, किराणा दुकाने, हॉटेल्स, टपऱ्या आणि भाजी मंडईत प्लास्टिकच्या पिशव्या अजूनही मोठ्या प्रमाणात वापरल्या जात आहेत.

पालिकेकडून होणारी कारवाई अल्पजीवी ठरत असल्यामुळे व्यापाऱ्यांनी नियमांना हरताळ फासला आहे. आरोग्य व पर्यावरण विभागाकडून कारवाईची भीती नसल्यामुळे व्यापारी निर्धास्तपणे कमी दर्जाच्या प्लास्टिक पिशव्या ग्राहकांना देत आहेत. सहाय्यक आरोग्य अधिकारी तानाजी दाते यांनी सांगितले की, “वेळोवेळी कारवाई केली जात असून दंड वसूल होतो.”

सकारात्मक बाब म्हणजे काही दुकानदारांनी शिस्त पाळत प्लास्टिक पिशव्या पूर्णपणे बंद केल्या आहेत. त्यांनी ग्राहकांना स्वतःची पिशवी आणण्याचे आवाहन केले आहे, तर काहींनी कापडी पिशव्या तयार केल्या आहेत. नागरिकांनीही प्लास्टिकमुक्त शहरासाठी कागदी व कापडी पिशव्यांचा वापर करणे गरजेचे आहे. पालिका आणि नागरिकांच्या संयुक्त प्रयत्नाशिवाय ही बंदी यशस्वी होणार नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे

error: Content is protected !!
Exit mobile version