टेक्सास अमेरिका, ५ जुलै २०२३ : योग-संगीता आणि एसजीएस गीता फाऊंडेशनतर्फे अमेरिकेतील टेक्सासमध्ये सोमवारी एकत्र गीता पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जवळपास दहा हजार लोकांनी एकत्रित गीता पठण केलं. टेक्सासमध्ये झालेल्या या गीता पठणाच्या कार्यक्रमात ४ वर्षांपासून ८४ वर्षापर्यंतच्या वयोगटातील हजारो लोकांनी सहभाग घेतला.
हे सर्व गीता पठणासाठी जमलेले लोक गेल्या ८ वर्षांपासून सच्चिदानंद स्वामींशी संबंधित आहेत. म्हैसूरच्या अवधूत दत्त पीठम आश्रमाचे आध्यात्मिक संत गणपती सच्चिदानंद जी यांच्या उपस्थितीत लोकांनी गीतापाठ केले. स्वामी गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिकेत असे कार्यक्रम करत आहेत.
अवधूत दत्त पीठाची स्थापना १९६६ मध्ये सच्चिदानंद स्वामी यांनी केली. ही आंतरराष्ट्रीय आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कल्याणकारी संस्था असुन सच्चिदानंद स्वामी भगवद्गीतेचा उपदेश करण्यासाठी, धर्माच्या मूल्यांचा प्रसार करण्यासाठी या संस्थेच्या माध्यमातून असे कार्यक्रम करतात.
न्युज अनकट प्रतिनिधी : गुरुराज पोरे