गोल पोस्ट हवामान घटप्रभा नदीवरील फाटकवाडी धरण ओव्हरफ्लो

घटप्रभा नदीवरील फाटकवाडी धरण ओव्हरफ्लो

आंबोली, कोल्हापूर ७ जुलै २०२३: आंबोली-चौकुळ परिसरात गेल्या १० दिवसांत दमदार पाऊस पडत आहे. चौकुळ परिसरातील घटप्रभा नदीवरील फाटकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. १.५४ टीएमसी क्षमतेचे हे धरण सध्या ओव्हरफ्लो झाले आहे. हे चंदगड तालुक्यातील तीन मध्यम प्रकल्पांपैकी सर्वात मोठे धरण आहे, तर अन्य दोन जंगमहट्टी व जांबरे असे प्रकल्प आहेत. ते पावसाळ्यात काहीसे उशीरा आणि धिम्या गतीने भरतात.

यंदा फाटकवाडी पाणलोट क्षेत्रात ५०१ मीमी पावसाची नोंद झाली असून धरण भरल्याने परिसरातील शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त केले जात आहे. गेल्या आठवड्यात आंबोली-चौकुळ परिसरात दमदार पाऊस झाला आहे. त्यामुळे फाटकवाडी धरण ओव्हरफ्लो झालय.

शेकडो क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. २००८ पासून पूर्ण क्षमतेने हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. येथे वीजनिर्मिती केंद्रही उभारण्यात आलेले आहे. चौकुळ-आंबोली परिसरातील अन्य काही पाण्याचे लहान मोठ्या स्त्रोतामुळे हे धरण जलद गतीने भरण्यास मदत होती. येथील परिसर हा निसर्गरम्य असून धरण परिसरात पर्यटन क्षेत्रात अनेक संधी निर्माण होऊ शकतात, याकडे शासन, लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देणे आवश्यक आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version