गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे मटार महाग, रताळं भाव खातंय, टोमॅटो स्वस्त!

मटार महाग, रताळं भाव खातंय, टोमॅटो स्वस्त!

पिंपरीच्या मोशी उपबाजारात नवरात्रोत्सवाच्या तोंडावर भाजीपाल्याच्या आवकेत मोठा बदल दिसून येत आहे. मटारने आपले भाव वाढवले असून, रताळ्यांनीही चांगलाच भाव खाल्ला आहे. तर दुसरीकडे, टोमॅटोचे भाव मात्र खाली घसरले आहेत. मोशी बाजारात तब्बल ४,८१६ क्विंटल फळभाज्या, ७९,६२० गड्या पालेभाज्या आणि ६६० क्विंटल फळांची आवक झाली.

विशेषतः १९८ क्विंटल रताळी दाखल झाली असून, त्यांना किरकोळ बाजारात ८० रुपये प्रति किलो भाव मिळत आहे. मटार आणि गवारचे भाव पितृपंधरवड्यापासून चढेच आहेत. याउलट, टोमॅटोचे दर १० रुपये प्रति किलोपर्यंत खाली आल्याने गृहिणींना दिलासा मिळाला आहे. एकूणच, नवरात्रीच्या निमित्ताने बाजारपेठेत भाज्यांची विविधता पाहायला मिळत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी चैतन्य पगारे

error: Content is protected !!
Exit mobile version