गोल पोस्ट आंतरराष्ट्रीय बुर्ज खलिफावर’ भारताचा तिरंगा, युएईत पीएम मोदींचे भव्य स्वागत

बुर्ज खलिफावर’ भारताचा तिरंगा, युएईत पीएम मोदींचे भव्य स्वागत

दुबई, युएई १५ जुलै २०२३ : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या संयुक्त अरब अमिरातच्या दौऱ्यावर आहेत, या दरम्यान जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफावर भारताचा तिरंगा प्रदर्शित केला गेला. पीएम मोदी यांच्या स्वागतार्ह दुबईत असलेल्या जगातील सर्वात उंच इमारतीवर भारताचा राष्ट्रीय ध्वज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र देखील प्रदर्शित केले आहे.

आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अबुधाबी विमानतळांवर आगमन झाले. यानंतर विमानतळावर युएई चे क्राउन प्रिन्स शेख खालेद बिन मोहम्मद झायेद अल नाहयान यांनी मोदींचे स्वागत केले. पंतप्रधान मोदी अधिकृत द्धिपक्षीय संबंधांवर चर्चा करण्यासाठी अबूधाबी येथे पोहचले. याविषयी दोन्ही नेत्यांची चर्चा होणार आहे.

नरेंद्र मोदींनी आज आयएनएस त्रिकंद या पर्शियन आखाती आणि ओमानच्या आखातामध्ये तैनात करण्यात आलेल्या मिशनची पाहणी केली. हे मिशन या प्रदेशातील सागरी सुरक्षेला हातभार लावत, व्यापाराची सुरक्षित हालचाल सुनिश्चित करते, असे याचे वैशिष्ट्य आहे. यावर पीएम मोदी यांचे सागर व्हिजन साकारत आहे, असे भारतीय नौदलाने म्हटले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version