गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे पंतप्रधान नरेंद्र मोदी ७ डिसेंबरला पुणे दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी ७ डिसेंबरला पुणे दौऱ्यावर

पुणे: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ७ डिसेंबर रोजी पोलिस महासंचालक परिषदेसाठी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. मुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपास्थित राहणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे.
या मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने पुण्यातील एका केंद्र सरकारच्या शिक्षण संस्थेच्या सभागृहात या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजशिष्टचरानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करण्यासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मात्र, मुख्यमंत्री परिषदेसाठी उपस्थित राहणार नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
यावेळी परिषदेमध्ये जम्मू-काश्मीरमधील कायदा आणि सुव्यवस्थे संदर्भात चर्चा होणार आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version