गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पुणे महापालिका आयुक्त रस्त्यावर उतरणार!

नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पुणे महापालिका आयुक्त रस्त्यावर उतरणार!

पुणेकरांच्या समस्या आता लवकरच सुटणार आहेत. शहरातील रस्त्यांवरील खड्डे, वाढती अतिक्रमणे आणि तुंबलेली गटारे यामुळे होणाऱ्या त्रासाची दखल घेऊन महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आयुक्त स्वतः सर्व महत्त्वाच्या विभागांच्या अधिकाऱ्यांसह थेट रस्त्यावर उतरून शहरातील समस्यांची पाहणी करणार आहेत. यामध्ये पथ, अतिक्रमण, मलनिस्सारण आणि इतर प्रमुख विभागांचा समावेश असणार आहे.

कोट्यवधी रुपये खर्च करूनही रस्त्यांची होणारी दुर्दशा आणि वारंवार होणाऱ्या खोदाईमुळे नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे, संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष परिस्थितीची जाणीव व्हावी, यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. पुणेकरांना भेडसावणाऱ्या समस्या प्रत्यक्ष जागेवर जाऊन समजून घेतल्यामुळे त्यावर तातडीने उपाययोजना केल्या जातील, अशी अपेक्षा आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी चंद्रशेखर रहांगडाले

error: Content is protected !!
Exit mobile version