गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे पीएमपीएलचा मोठा निर्णय एक हजार सीएनजी बस खरेदी, तोट्यातील मार्ग बंद होणार!

पीएमपीएलचा मोठा निर्णय एक हजार सीएनजी बस खरेदी, तोट्यातील मार्ग बंद होणार!

पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. पीएमपीच्या संचलनातील तोटा कमी करण्यासाठी आता बस मार्गांची फेररचना केली जाणार आहे. तसेच, एक हजार नवीन सीएनजी (CNG) बसेस खरेदी करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

बस मार्गांच्या फेररचनेसाठी लवकरच एका सल्लागाराची नियुक्ती केली जाईल. हा सल्लागार तोट्यातील मार्गांचा अभ्यास करून त्यांचा अहवाल सादर करेल. त्यामुळे काही तोट्यातील मार्ग बंद होण्याची किंवा त्यांच्या मार्गात बदल होण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त, उत्पन्न वाढवण्यासाठी बस डेपोच्या जागांचा व्यावसायिक वापर करण्याचाही विचार सुरू आहे.

सुरुवातीला एका डेपोवर प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबवला जाईल. या निर्णयामुळे पीएमपीएलची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी चंद्रशेखर रहांगडाले

error: Content is protected !!
Exit mobile version