गोल पोस्ट महाराष्ट्र जालन्यात पोलिसांच्या शोध मोहिमेत पुन्हा पिस्टल काडतूससह चार आरोपींना अटक

जालन्यात पोलिसांच्या शोध मोहिमेत पुन्हा पिस्टल काडतूससह चार आरोपींना अटक

जालना १९ डिसेंबर २०२३ : गजानन तौर या व्यक्तिची हत्या झाल्यापासुन, जालना शहरात अनधिकृत गावठी कट्टे बाळगणाऱ्यांवर पोलिस दोन दिवसापासुन मोहीम राबवित आहेत. त्यात परवा सहा कट्टे आणि सहा आरोपी तर काल पुन्हा दोन ठिकाणाहून दोन अवैद्य कट्टे एका आरोपीकडून जप्त करण्यात आले.

पोलिसांना याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने वेगवेगळे पथके तयार करून शहरात सहा जणांकडे कट्टे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली असता त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्याकडे दोन गावठी कट्टे पिस्टल, चार जिवन्त काडतूस मिळाले आहे. त्या अनुषंगाने दोन वेगवेगळे गुन्हे सहा आरोपी वर दाखल करण्यात आले. या आरोपीकडून दोन पिस्टल, चार काडतूस, तीन मोबाईल असा एक लाख सेहेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खणाळ यांनी दिली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : संजय आहेर

error: Content is protected !!
Exit mobile version