गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे आमदार सुनील शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त पोलीस बांधवांचा सन्मान

आमदार सुनील शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त पोलीस बांधवांचा सन्मान

पुणे, २० ऑक्टोबर २०२०: मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनिल शेळके यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व आमदार सुनील आण्णा शेळके युवा मंच मावळ यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना योद्धा म्हणून काम करणारे पोलिसांचा सन्मान केला.

देहूरोड येथील पोलिस स्टेशन मधील सर्व पोलिस बांधवांना मानपत्र सन्मानचिन्ह शाल देऊन सन्मानित करण्यात आलं. कोरोना महामारीच्या काळात स्वतःच्या कुटुंबाची पर्वा न करता जनसामान्यांच्या सेवेकरिता कोरोना नियंत्रण ठेवण्याचे महान कार्य पोलीस बांधवांनी केले आहे. याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मावळते अध्यक्ष श्री बबनराव भेगडे त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी महिला तालुकाध्यक्ष सुवर्णाताई राऊत, देहूरोड शहराध्यक्ष अॅड् कृष्णा दाभोळे, अध्यक्ष मिकीजी कोचर, तळेगाव शहर महिला अध्यक्ष सौ. सुनीता ताई काळोखे, उपाध्यक्ष मोनिका बेंजामिन, सरचिटणीस आदिती ताई सोरटे , रेखाताई दरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वरी आयवळे

error: Content is protected !!
Exit mobile version