गोल पोस्ट महाराष्ट्र राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे काल सायंकाळी विशेष विमानाने पुण्यात आगमन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे काल सायंकाळी विशेष विमानाने पुण्यात आगमन

पुणे ३ सप्टेंबर २०२४ : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे काल सायंकाळी विशेष वायुदलाच्या विमानाने पुण्यात लोहगाव विमानतळावर आगमन झाले. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

यावेळी केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, एअर कमोडोर आणि एअर ऑफिसर कमांडिंग शेखर यादव, लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धिरज सेठ, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनीधी : जयश्री बोकील

error: Content is protected !!
Exit mobile version