गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे हॉटेलवर चालू होता वेश्याव्यवसाय, पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवुन केल रॅकेट उघड

हॉटेलवर चालू होता वेश्याव्यवसाय, पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवुन केल रॅकेट उघड

पुणे, ८ सप्टेंबर २०२३ : पैशांचे आमिष दाखवून तरुणीकडून वेश्याव्यवसाय करुन घेणाऱ्या टोळीचा सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दाफाश केला आहे. लोणीकंदमधील हाँटेल मनोरा येथे पथकाने छापा टाकून सहा तरुणींची सुटका केली. या प्रकरणी दोघां मॅनेजरांना अटक केली आहे. याप्रकरणी प्रज्योत हिरीण्णा हेगडे आणि गिरीश श्याम शेट्टी, राहणार पेरणे फाटा अशी अटक केलेल्याची नावे आहेत. लोणीकंदमधील हाँटेल मनोरा येथे मुलींकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती पथकाला मिळाली होती.

सामाजिक सुरक्षा विभागाने तेथे बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. हॉटेलमध्ये सहा तरुणीकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याचे आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील, राजेश माळेगावे, अनिकेत पोटे, अंमलदार अजय राणे, राजेंद्र कुमावत, इरफान पठाण यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version