गोल पोस्ट महाराष्ट्र हिट अँड रन कायदा रद्द करून चालक संरक्षण कायदा लागू करावा या...

हिट अँड रन कायदा रद्द करून चालक संरक्षण कायदा लागू करावा या मागणीसाठी सोयगावात आंदोलन

छत्रपती संभाजी नगर ११ जानेवारी २०२४ : छत्रपती संभाजी नगरच्या सोयगावात केंद्र शासनाने लागू केलेला हिट अँड रन हा कायदा रद्द करून चालक संरक्षण कायदा लागू करावा या मागणीसाठी जय संघर्ष वाहन चालक- मालक संघटना सोयगाव यांच्या वतीने शहरातील मुख्य रस्त्यावरील संत गाडगेबाबा चौकात शांततेत अर्धा तास रास्तारोको करण्यात आला.

रास्तारोकोमुळे शेंदुर्णी व फर्दापूर येथून येणारी वाहन सेवा काही काळ विस्कळीत झाली होती. यावेळी सोयगाव पोलीस ठाण्याचे पोलीस सहायक निरीक्षक अनमोल केदार यांनी बंदोबस्त ठेवला. जय संघर्ष वाहन चालक मालक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण वाघ, सोयगाव तालुका अध्यक्ष राजेंद्र बडक, उपाध्यक्ष विष्णू गव्हाणे, सचिव अविनाश देसाई यांच्यासह इतर सदस्य व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते

न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय चौधरी

error: Content is protected !!
Exit mobile version