गोल पोस्ट इतर दिनविशेष ‘शिक्षक दिन’ निमित्त पुणे शहर भाजपाकडून शिक्षकांचा सन्मान

‘शिक्षक दिन’ निमित्त पुणे शहर भाजपाकडून शिक्षकांचा सन्मान

पुणे, दि. ५ सप्टेंबर २०२०: आज भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांची जयंती व त्यांचा जन्मदिवस हा ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.

‘शिक्षक’ हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. आपल्या गुरू, शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. म्हणून भारतीय जनता पक्ष पुणे शहराच्या वतीने शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रातिनिधिक स्वरूपात काही शिक्षकांचा शिक्षक दिनानिमित्त सन्मान करण्यात आला व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमास शहराध्यक्ष जगदीश मुळीक, सरचिटणीस राजेश येणपुरे, दीपक नागपुरे, दिलीप काळोखे, गणेश कळमकर, अनिता तलाठी, प्रा आंबेकर, सुनील माने, डॉ शेंडे,संजय देशमुख, शिक्षक व पदाधिकारी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वरी आयवळे.

error: Content is protected !!
Exit mobile version