गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे पुणे काँग्रेस व्यापारी सेलच्या वतीने ५५५ जणांना ५ रुपयांत गणेशमूर्ती

पुणे काँग्रेस व्यापारी सेलच्या वतीने ५५५ जणांना ५ रुपयांत गणेशमूर्ती

पुणे, ९ सप्तबर २०२३ : पुणे शहरातील पुणे शहर जिल्हा काँग्रेस पार्टी व्यापारी सेलच्या वतीने, सुमारे ५५५ स्थानिक महिलांना “फक्त पाच रुपयांत” गणेशमूर्तींचे वाटप माजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रभाग क्रमांक २८ मधील काही रहिवाशांना गणपती बाप्पाच्या मूर्तीचे वाटप केले. यावेळी अरविंद शिंदे (अध्यक्ष, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी), मोहन जोशी, अभय छाजेड, विजयकांत कोठारी, पन्नालालजी लुणावत, स्नेहल पाडळे, नीता राजपूत, मनीषा फते, सोनकांबळे, सुरेश चौधरी, उमेश मंडोत, मनिषा चौधरी, मनमोहन पाटील आदी उपस्थित होते. यावेळी सीमा जैन महाडिक, अनुसया गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

भरत सुराणा (अध्यक्ष, पुणे शहर जिल्हा काँग्रेस व्यापारी सेल) व योगिता सुराणा यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव केला. यावेळी पृथ्वीराज चव्हाण चिंता व्यक्त करत म्हणाले, सध्या महागाई खूप वाढली आहे. मात्र भरत सुराणा आणि योगिता सुराणा गेल्या अनेक वर्षांपासून गणेशमूर्ती जवळपास मोफत म्हणजेच ५ रुपये लोकांपर्यंत पोहोचवत आहेत.

भरत सुराणा आणि त्यांची पत्नी योगिता सुराणा यांनी गणेशमूर्ती गोळा करून त्या गरीब समाजाला ५ रुपयात वाटण्याचा सुंदर उपक्रम घेतला आहे. नावांची लॉटरी काढुन नागरीकांना गणपतीचे वाटप केले जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

error: Content is protected !!
Exit mobile version