गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे सांडपाणी प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार आयुक्त नवल किशोर राम

सांडपाणी प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार आयुक्त नवल किशोर राम

पुणे शहरातील सांडपाणी प्रक्रियेत लवकरच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. या माध्यमातून स्वच्छता कर्मचाऱ्यांचे काम सोपे, जलद आणि अधिक सुरक्षित होणार असल्याची घोषणा पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी केली आहे. ‘शहरी स्वच्छता: यंत्राधारित सांडपाणी टाकी स्वच्छता उपाय’ या विषयावरील राष्ट्रीय परिसंवादाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.

त्यांनी स्पष्ट केले की “स्वच्छ भारत श्रेष्ठ भारत” हे स्वप्न साकार करण्यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान आणि सुरक्षितता हा कणा आहे. सरकार आणि स्वयंसेवी संस्था यासाठी अनेक उपक्रम राबवत असल्या तरी समाजातील सर्व घटकांचा सहभागही महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले. या घोषणेमुळे सांडपाणी प्रक्रियेत कार्यरत कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी चंद्रशेखर रहांगडाले

error: Content is protected !!
Exit mobile version