गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे नगर रस्त्यावर कोंडीला रामराम! सुरक्षित यू-टर्नसाठी अंतिम आराखडा तयार

नगर रस्त्यावर कोंडीला रामराम! सुरक्षित यू-टर्नसाठी अंतिम आराखडा तयार

नगर रस्त्यावरील वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून प्रशासनाने मोठे पाऊल उचलले आहे. येरवडा ते खराडी दरम्यान शास्त्री नगर चौक, रामवाडी आणि खुळेवाडी परिसराची पाहणी करून अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी सुरक्षित यू-टर्न, पादचारी मार्ग आणि बॉटलनेक्स दूर करण्याचा अंतिम आराखडा तयार होणार असल्याची माहिती दिली.

रामवाडीतील रिक्षा थांबा हटवणे, मेट्रो स्टेशनजवळ दुचाकी पार्किंगची सोय करणे आणि यू-टर्न परिसरात पादचारी सिग्नल व साइन बोर्ड बसवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या बदलांमुळे वाहतूक अधिक सुरक्षित, सुलभ होऊन नागरिकांना कोंडीच्या त्रासातून मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी चैतन्य पगारे

error: Content is protected !!
Exit mobile version