गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे रेल्वेतून मोबाईल चोरणाऱ्या दोघांना अटक

रेल्वेतून मोबाईल चोरणाऱ्या दोघांना अटक

रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या मोबाईलची चोरी करणाऱ्या दोन आरोपींना लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून २० मोबाईल जप्त करण्यात आले असून, त्यांची किंमत सुमारे १,९०,००० रुपये आहे.

अटक करण्यात आलेल्यांची नावे बुद्धराज मोरपाल बागडी (३२) आणि अमरलाल हंसराज बागडी (२२) असून हे दोघे राजस्थानचे रहिवासी आहेत. मंगळवार पेठेतील सिग्नल चौकात झोपडीत राहत होते.

३० ऑगस्ट रोजी दानापूर एक्स्प्रेसमध्ये चढणाऱ्या एका प्रवाशाचा मोबाईल चोरीला गेला. तपासादरम्यान पोलिसांनी दोघांना पाठलाग करून ताब्यात घेतले.

आरोपींनी जुन्या बाजारातून चोरीचे मोबाईल विकत घेऊन कमी किंमतीत विकल्याची कबुली दिली. लोहमार्ग पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे रेल्वे प्रवाशांची सुरक्षितता वाढली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी चैतन्य पगारे

error: Content is protected !!
Exit mobile version