गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, पीक-अप पलटी होऊन एकजण ठार तर एकजण गंभीर...

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, पीक-अप पलटी होऊन एकजण ठार तर एकजण गंभीर जखमी

दौंड, पुणे २७ जुलै २०२३ : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कुरकुंभ हद्दीत एका पीकअप वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पिक-अपमधील दोन सख्ख्या भावांपैकी एक ठार तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. आज पहाटे दोन वाजता हा अपघात झालाय.

राधेश्याम देवराव वानखेडे वय २५, सध्या राहणार लोणी काळभोर, मुळ गाव कमलापूर, ता.पूर्णा, जि.परभणी. असे मृत्यूमुखी पडलेल्याचे नाव आहे. तर अशोक देवराव वानखेडे वय ३५ असं गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. जखमींवर खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

याबाबत अधिक माहितीनुसार, पिक-अप (एमएच १२ युएम ०३०४) हे वाहन लोणी काळभोर येथून गुळाचा माल घेऊन बार्शीकडे जाण्यासाठी निघाले होते. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पिक-अपचा अपघात झाल्याने पिकअप रस्त्यावर पलटी झाला. या घटनेत पिकअपमधील अशोक वानखेडे यांना गंभीर दुखापत झाली. राधेश्याम वानखेडे यांना जबर मार लागल्याने ते मृत्युमुखी पडले.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version