गोल पोस्ट महाराष्ट्र पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोविड -१९ ची लागण

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोविड -१९ ची लागण

पुणे, दि. ४ जुलै २०२० : पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोविड -१९ ची लागण झाल्याची बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना सौम्य ताप येत होता. त्या कारणाने त्यांची कोविड -१९ चाचणी करण्यात आली. त्यांचा चाचणी अहवाल आला आहे. संकटाच्या काळामध्ये त्यांनी आपले काम सातत्याने सुरू ठेवले होते. पुणे शहर नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.

यासंदर्भात मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून सांगितले ते म्हणाले की, “थोडासा ताप आल्याने मी माझी कोविड १९ ची टेस्ट केली असता, ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती स्थिर असून लवकरच बरा होऊन पुन्हा तुमच्या सेवेत असेल. उपचारादरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत राहीन .”

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version