गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे पुण्यात नागरिकत्व कायद्याविरोधात युवा क्रांती दलाचे आंदोलन

पुण्यात नागरिकत्व कायद्याविरोधात युवा क्रांती दलाचे आंदोलन

पुणे : देशभरात नागरिकत्व कायद्याविरोधात राज्याराज्यात आंदोलने सुरू आहेत. अनेक ठिकाणी त्याचे वेगवेगळे पडसाद उमटले आहेत. त्यातच पुण्यातील कोथरूड परिसरात युवा क्रांती दलाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी ( दि.४) रोजी कर्वे पुतळ्याजवळ “आम्ही भारतीय लोक” म्हणत आंदोलन केले. या आंदोलनात परिसरातील नागरिकांनीही सहभाग घेतला होता.
“संविधान जिंदाबाद’ च्या घोषणा देत नागरिकांनी जोरदार आंदोलन केले. यावेळी इतर नागरिकांनाही आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
दोन तास सुरु असलेल्या या आंदोलनाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आंदोलनादरम्यान या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु पोलिसांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून विशेष काळजी घेतल्याचे दिसून आले. पोलिसांनी आंदोलकांना चांगले सहकार्य केल्याने आंदोलन यशस्वीरीत्या पार पडले.

error: Content is protected !!
Exit mobile version