गोल पोस्ट गुन्हा पुण्यातील शूज शोरूम मालकाची अपहरण करून हत्या

पुण्यातील शूज शोरूम मालकाची अपहरण करून हत्या

पुणे : पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर असलेल्या एका नामांकीत शुज शोरुमच्या मालकाचे दोन कोटी रुपयांसाठी साताऱ्यातील लोणंद येथे नेऊन गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
अपहरणकर्त्यांनी व्यावसायिकाची साताऱ्यातील लोणंद येथे पिस्तुलातून गोळी घालून हत्या केली. चंदन कृपादास शेवानी (वय ४८, रा. बंडगार्डन) असे खुन झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शेवानी यांचा चप्पल विक्रीचा व्यवसाय आहे. लक्ष्मी रस्त्यावर त्यांचे चप्पल विक्रीचे दुकान आहे. मेवानी हे शनिवारी दिवसभर घरीच होते. परंतु रात्री उशिरा ते घराबाहेर पडले. रात्री साडे दहा ते अकराच्या सुमारास त्यांच्याशी मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु संपर्क होऊ शकला नाही. संपर्क साधला, मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी तत्काळ बंडगार्डन पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनीही त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा फोन बंद होता.
आज दुपारी बारा वाजता सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्‍यात असणाऱ्या पाडेगाव येथे एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह स्थानिक नागरिकांना आढळून आला. त्याची माहिती लोणंद पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्या अनोळखी व्यक्तीच्या डोक्‍यात गोळी झाडून व अंगावर तीक्ष्ण हत्याराने वार करुन खुन केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या घटनेनंतर सातारा पोलिसांनी पुण्यासह अन्य शहरातील पोलिसांशी संपर्क साधून हरवलेल्या व्यक्तींची माहिती घेतली. त्यावेळी संबंधीत मृतदेह हा बंडगार्डन पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या चंदन शेवानी यांचा असल्याची माहिती मिळाली.याप्रकरणीअधिक तपास पोलीस करत आहेत.

error: Content is protected !!
Exit mobile version