गोल पोस्ट स्पॉटलाइट सिनेमा पुष्पा…. पुष्प राज, नक्की आहे तरी कुठे हे आता कळणार?

पुष्पा…. पुष्प राज, नक्की आहे तरी कुठे हे आता कळणार?

मुंबई,८ एप्रिल २०२३: २०२१ साली ‘पुष्पा द राइज’ या चित्रपटाने फक्त महाराष्ट्रावरच नाही तर भारतावर अधिराज्य गाजवलं. चित्रपटाने प्रदर्शित होतात अनेक विक्रम स्वतःच्या नावावर करून घेतले. मोठे मोठे दिग्गज कलाकार या चित्रपटाच्या गाण्यावर थिंकले तर चित्रपटातील डायलॉग ने सोशल मीडिया भरून गेलं. चित्रपटाच्या यशाची पावती म्हणजेच पुष्पा द राइज या चित्रपटाने जगभरात ३०० कोटींहून अधिक कमाई केली.

परंतु आता पुष्पा नक्की आहे तरी कुठे? या प्रश्नाचे उत्तर साउथ चा सुपरस्टार अल्लू अर्जुनने त्याच्या वाढदिवसाच्या एक दिवस अगोदर पुष्पा २ या चित्रपटातील त्याचा लुक सोशल मीडियावर शेअर करून दिले आहे. तर इंस्टाग्राम वर आता ‘पुष्पा द रुल’ चे पोस्टर देखील मोठ्या प्रमाणात शेअर झाले आहे. यातील अल्लू अर्जुन चा लुक अतिशय वेगळा आणि थक्क करणार आहे. गळ्यात लिंबाचे मोठे हार, हातात बांगड्या, कानात झुमके असा त्याचा लुक पाहून पोस्टरवर अनेक प्रतिक्रियांचा पाऊस पडताना दिसतोय.

पुष्पा २- द रूल या चित्रपटाची हिंदी भाषेत पहिली झलक पाहायला मिळाली. युट्युब वर प्रदर्शित झालेल्या या व्हिडिओला एकाच दिवसात २८ मिलियन व्ह्युज १.३ मिलियन लाईक्स आणि जवळपास ४३ हजार कमेंट्स मिळाले आहेत. प्रेक्षकांच्या या घवघवीत यशामुळे हा व्हिडिओ युट्युब वर सर्वात जास्त पाहिलेला म्हणजेच पहिल्या क्रमांकाचा व्हिडिओ आहे. पुष्पा चित्रपट त्यातील कलाकारांचा अभिनय, चित्रपटाची कथा आणि त्यामधील गाण्यांमुळे यशस्वी झाला. ‘पुष्पा २- द रूल’ या चित्रपटांमध्ये पुष्पा नक्की आहे तरी कुठे? या प्रश्नाचे उत्तर प्रेक्षकांना मिळणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी:- ऋतुजा पंढरपुरे

error: Content is protected !!
Exit mobile version