गोल पोस्ट इतर राजकारण राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे येणार एकत्र?

राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे येणार एकत्र?

मुंबई: ६ सप्टेंबर २०२२, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणपती दर्शनाच्या निमित्ताने राज ठाकरेंच्या घरी भेट दिली होती. या भेटिमागे नक्कीच काहीतरी राजकीय कारण आहे, अशा चर्चा देखील होत्या.

आता मात्र, मनसे आणि शिंदे गटामध्ये जवळीक मोठ्या प्रमाणत वाढली आहे. राज ठाकरे समर्थक आणि एकनाथ शिंदे समर्थक यांच्या मध्ये असलेली ही जवळीक येत्या काळात युतीचे चिन्ह दाखवत आहे.

काही दिवसातच आपल्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि एकनाथ शिंदे एकत्र आलेले पाहायला मिळू शकतात. मुंबई महापालिकेच्या निवणुकीच्या आधी झालेल्या भेटीगाठींना नक्कीच राजकीय किनार आहे.

राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील वाढलेली राजकीय जवळीक पाहता ही युती नक्की शिवसेनेसाठी अडचण ठरणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: सुरज गायकवाड.

error: Content is protected !!
Exit mobile version