गोल पोस्ट इतर राजकारण राज ठाकरे यांची पुण्यातील पहिली सभा पावसामुळे रद्द.

राज ठाकरे यांची पुण्यातील पहिली सभा पावसामुळे रद्द.

राजकारणात प्रचाराची रणधुमाळी सुरु असताना आज राज ठाकरे यांच्या पहिल्या सभेवर पावसाने बंदी घातल्याचे आज पाहायला मिळत आहे.
कारण सभेच्या ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळाली.
त्यामुळे मनसेचे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज ठाकरे यांनी पावसामुळे पुण्यातील पहिली सभा रद्द केली आहे
आता राज ठाकरे हि सभा कधी घेणार याकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागले आहे.
मनसेचे उमेदवार किशोर शिंदे,वसंत मोरे ,अजय शिंदे ,आणि सुहास निम्हण यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे आज पुण्यात सभा घेणार होते.

error: Content is protected !!
Exit mobile version