गोल पोस्ट राष्ट्रीय राजस्थान-हरियाणातील दरोडेखोरांना नगरमध्ये अटक

राजस्थान-हरियाणातील दरोडेखोरांना नगरमध्ये अटक

नगर, १२ ऑगस्ट २०२३ : दरोड्याच्या तयारीत असलेल्या ११ जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. दरोडा टाकण्यासाठी शेंडी बायपास परिसरात एका हाँटेलजवळ दबा धरून बसलेल्या या टोळीला पोलिसांनी पकडले आहे. आरोपींकडून घातक शस्त्रे व दोन ट्रकसह ३५ लाख ६२ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. हरियाणा व राजस्थान राज्यातील आरोपींच्या टोळीत समावेश आहे.

या कारवाईत आरोपींकडून एक तलवार, तीन सुरे, कटर, फायटर, स्कू ड्रायव्हर, लाकडी दांडके, गलोल, मिरची पुड, तीन मोबाईल व दोन ट्रक जप्त करण्यात आले आहेत. पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्यासह उपनिरीक्षक सोपान गोरे, दत्तात्रय गव्हाणे, संदीप पवार, देवेंद्र शेलार, रवींद्र कर्डिले, विजय ठोंबरे, संतोष लोढे, सचिन आडबल आदींनी ही सर्व कारवाई केली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version