गोल पोस्ट इतर राजकारण राज्यात येणार ‘महाशिवआघाडी’चे सरकार?

राज्यात येणार ‘महाशिवआघाडी’चे सरकार?

मुंबई: राज्यात आता सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे.त्यात आता राज्यात ‘महाशिवआघाडी’चे सरकार येणार का? या चर्चांना आता उधाण येऊ लागले आहे.

आज संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस-राष्ट्रवादीचे कौतुक केले आहे. तर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी भाजप सत्ता स्थापनेत अपयशी ठरल्यास आघाडी याबाबत विचार करू शकते, असे मलिक यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनीही तसेच संकेत दिले आहेत.
त्यामुळे महाशिवआघाडीचे राज्यात सरकार येणार अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version