गोल पोस्ट गुन्हा बलात्कार प्रकरणी माजी नगरसेवक मोहम्मद शेखला अटक

बलात्कार प्रकरणी माजी नगरसेवक मोहम्मद शेखला अटक

मुंबई : अमेरिकेत स्कॉलरशिप मिळवून देण्याचा आमिषाने १४ वर्षांच्या नातेवाईक असलेल्या मुलीवर माजी नगरसेवक मोहम्मद सिराज शेख यांने तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी ऑक्टोबर महिन्यात या पीडित मुलीने या नगरसेवकाविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र तक्रार दाखल केल्यानंतर सिराज शेख फरार झाला होता.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गोवंडी येथील शिवाजीनगर परिसरातील सिराज शेख हा माजी नगरसेवक होता. ऑक्टोबर महिन्यात सिराज यांने त्या मुलीला अमेरिकेत शिक्षणासाठी मदत करतो आणि त्यासाठी तुला स्कॉलरशिप देता असं सांगत त्याने त्या मुलीवर बलात्कार केला होता. त्यानंतर तिने कोणाला सांगू नये म्हणून त्याने अजून इजा करण्याची धमकी दिली होती.

पण याप्रकरणी पोक्सो अन्वये शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र गुन्हा दाखल केल्यानंतर सिरोज शेख फरार झाला. पोलीस त्याचा शोध घेत असल्यामुळे तो लपून राहिला होता. त्यानंतर प्रभारी पोलीस निरीक्षक दीपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अपर्णा जोशी, चंद्रकांत दळवी यासोबत पथकाने सिराजचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांना सिराज शेख गोवंडी परिसरात आला असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे अखेर त्याला गुरुवारी(दि.११) रोजी मुंबई गुन्हे शाखा युनिट ६ च्या पथकाने अटक केली आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version