गोल पोस्ट इतर राजकारण राष्ट्रवादीला सत्तास्थापनेचे आमंत्रण

राष्ट्रवादीला सत्तास्थापनेचे आमंत्रण

मुंबई: नुकत्याच आलेल्या बातमीनुसार राज्यपालांनी राष्ट्रवादीला सत्तास्थापनेसाठी आमंत्रण दिले आहे. आज शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी दावा करण्याची मुदत दिली गेली होती. शिवसेना सत्तास्थापनेसाठी दावा करण्यास असमर्थ ठरली. अगदी शेवटच्या क्षणाला काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देण्यास नकार दिला आहे त्यामुळे राज्यात सत्तास्थापनेसाठी नवीन समीकरणांना सुरुवात झाली आहे.
उद्या राष्ट्रवादी सत्तास्थापनेसाठी दावा करेल. याआधी शिवसेना हा मोठा पक्ष असून राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा देणे हा पर्याय होता परंतु उद्या सर्व समीकरणे बदललेली दिसणार आहेत कारण आता शिवसेनेला राष्ट्रवादीला पाठिंबा देईल. पाठिंबा देणे आणि पाठिंबा घेणे या दोन गोष्टींमध्ये मोठा फरक आहे. शिवसेना उद्या काय करते यावर सगळ्यांचे लक्ष लागून राहणार आहे. सध्यातरी सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादी हा मोठा पक्ष आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version