गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे रावेतजवळ अपघातात दोन जखमी

रावेतजवळ अपघातात दोन जखमी

पुणे : पुणे-मुंबई महामार्गावर रावेत जवळ सायंकाळी ५च्या सुमारास मारुती स्विफ्ट आणि आयशर टेम्पो यांचा अपघात झाला. स्विफ्टमधील सर्वजण दारू प्यायले असल्यामुळे कार चालकाचा ताबा सुटून ती कार समोर उभ्या असलेल्या आयशर टेम्पोला जावून धडकली. त्यात कारचे मोठे नुकसान झाले आहे.
या अपघातात दोन जण जखमी झाले आहे. लाल रंगाची स्विफ्ट नवीनच घेतली असल्याने तिचे फार नुकसान झाले आहे. घटनास्थळी बघणाऱ्यांची एकच गर्दी जमली होती.

error: Content is protected !!
Exit mobile version