गोल पोस्ट महाराष्ट्र सुप्रसिद्ध भजन सम्राट हरिष दायमा यांचे अयोध्या नगरीकडे पायी प्रस्थान

सुप्रसिद्ध भजन सम्राट हरिष दायमा यांचे अयोध्या नगरीकडे पायी प्रस्थान

मालेगाव, नाशिक २९ डिसेंबर २०२३ : अयोध्या येथे राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा २२ जानेवारी रोजी होणार आहे. त्यापूर्वी भाविकांना रामलल्लाच्या दर्शनाचे वेध लागले आहेत. प्राण-प्रतीष्ठा महोत्सवासाठी नाशिकच्या मालेगाव शहरातील धर्म प्रेमी, भजन सम्राट हरीष संजय दायमा हे मालेगाव ते अयोध्या पर्यत पायी प्रवासासाठी, आज श्रीराम मंदीर रामसेतु पुल येथे दर्शन घेऊन अयोध्या यात्रेसाठी प्रस्थान केले आहे.

हरीष दायमा हे मालेगाव शहरातील सुप्रसिद्ध भजन सम्राट असुन ऐक यशस्वी सुत व्यापारी सुध्दा आहे. मालेगाव पासुन अयोध्या हे अंतर तब्बल १०८० कि.मी. असुन दररोज ३५ ते ४५ किलो मीटर चालण्याचा त्यांचा मानस असुन २३ दिवसात पोहचून दर्शन घेत ऐतिहासिक महोत्सवाचे साक्षीदार होण्याचे त्यांचे उद्दीष्ट आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : नाना आहिरे

error: Content is protected !!
Exit mobile version