गोल पोस्ट क्रीडा रॉजर फेडरर घेणार टेनिस पासून एक वर्षाचा संन्यास

रॉजर फेडरर घेणार टेनिस पासून एक वर्षाचा संन्यास

बॉटमिन्गेन, स्विझ्जरलैंड १३ जून २०२० : स्विस प्लेयर व टेनिस सुपर स्टार रॉजर फेडरर हा त्याच्या गुडघ्या वरील दुस-या शस्त्रक्रियेमुळे यावर्षी कुठलाही टेनिसचा सामना खेळणार नाही.

याबाबत बोलताना त्याने आपल्या ट्वीटर हैंडल वर असे म्हटले आहे की, ” मला माझ्या उजव्या गुडघ्यावर अतिरिक्त आर्थोस्कोपिक प्रक्रिया करायची आहे. मी जे २०१९ च्या हंगामापर्यंत जे माझ्या खेळाचे प्रदर्शन केले तसेच मी पुन्हा माझ्या सर्वोच्च स्तरावर खेळण्यासाठी १००% करण्यासाठी तयार करण्यासाठी मला थोडा वेळ लागणार आहे, तशी मी योजना देखील आखली आहे. मला माहितीय की माझ्या या एक वर्षाच्या काळात माझे चाहते मला नक्कीच मीस करतील नाराज होतील पण मी पण या गुडघ्यावरील प्रक्रियेनंतर २०२१ च्या नव्या हंगामाच्या सुरूवातीला तुम्हा सर्वांना भेटण्यास उत्सुक आहे .”

राजर फेडररच्या या एक वर्षाच्या संन्यासामुळे त्याचे चाहते नक्कीच त्याचा खेळ पाहण्यास मुक्तील.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version