गोल पोस्ट क्रीडा क्रिकेट कोलकाता नाईट रायडर्स संघावर रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाने मिळवला ८ गडी...

कोलकाता नाईट रायडर्स संघावर रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाने मिळवला ८ गडी राखून विजय

दुबई : २२ ऑक्टोबर,२०२० काल झालेल्या आयपीएल २०२० मधील ३९ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने कोलकाता नाईट रायडर्स संघावर ८ विकेट्स राखून विजय मिळवला आहे. या सामन्याचा शिल्पकार ठरला तो मोहम्मद सिराज. सिराज याने ४ षटकात अवघ्या ८ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. त्याने पहिल्या २ षटकात एकही धाव न देता ३ विकेट्स घेतल्या.

सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजी करतांना कोलकाता नाईट रायडर्स सलामीच्या फलंदाजांना चांगली सुरुवात करून देता आली नाही. कर्णधार इओन मॉर्गन याने सर्वाधिक ३० धावा केल्या. तसेच लॉकी फर्गुसन याने १९ धावांची खेळी केली. आणि शेवटी कुलदीप यादव याने १२ धावा केल्या. याच धावांच्या जोरावर केकेआर संघ २० षटक अखेर ८ बाद ८४ धावाच करू शकले.बँगलोर संघाकडून मोहम्मद सिराज याने ३ विकेट्स , युजवेन्द्रा चहल याने २ तर वॉशिंग्टन सुंदर याने १ विकेट आपल्या नावे केला.

८५ धावांचा पाठलाग करताना अारोन फिंच याने १६ तर पदीकल याने २५ धावा केल्या. तसेच गुर्किरत सिंह याने नाबाद २१ आणि विराट कोहली याने नाबाद १८ धावा करत सामना आर.सी.बी संघाला जिंकवून दिला. या सामन्यानंतर आर. सी.बी संघाचे प्ले ऑफ मध्ये जाण्याचे मार्ग मोकळे झाले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे

error: Content is protected !!
Exit mobile version