अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी ग्रामीण पोलीस सतर्क, नागपुर एसपींनी महामार्गावर पाळत वाढवण्याच्या दिल्या सूचना

नागपूर २६ जून २०२३: देशाच्या मध्यवर्ती भागात असल्याने नागपुरातूनच इतर राज्ये आणि जिल्ह्यांमध्ये अमली पदार्थांचा पुरवठा केला जातो असा कयास आहे. काही अमली पदार्थांचे तस्कर येथील ग्रामीण भागात आपले अड्डे तयार करत असल्याची माहिती एसपी विशाल आनंद यांना मिळाली असुन त्यांनी सर्व पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेला महामार्गांवर दक्षता वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

प्रसारमाध्यमांशी झालेल्या चर्चेत ते म्हणाले की, तरुणांमध्ये अंमली पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण वाढत आहे. त्यांच्याकडून ग्रामीण भागातही अमली पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे ग्रामीण भागात असा कोणताही गुन्हा होऊ नये, अशा सक्त सूचना सर्व ठाणेदारांना देण्यात आल्या आहेत. सर्वांना हाय अलर्ट राहण्यास सांगण्यात आले असुन केवळ ड्रग्जच नाही तर ग्रामीण भागात कोणताही अनैतिक व्यापार होऊ नये याची काळजी घेण्याचे आदेशही त्यांनी दिले.

यावर्षी पोलिसांनी ४ मोठ्या कारवाया केल्या आहेत. ग्रामीण मार्गावरून कोठेही अमली पदार्थांची तस्करी होऊ नये यासाठी एलसीबी आणि एसएचओ यांना महामार्गावरून जाणाऱ्या सर्व वाहनांची बारकाईने तपासणी करण्यास सांगितले आहे. अमली पदार्थ आणि कोणत्याही प्रकारच्या नशेपासून तरुणांना लांब राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

यासोबतच नागरिकांना अमली पदार्थांशी संबंधित काही माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधून मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आलय. आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा