गोल पोस्ट इतर माहिती पुण्याच्या सहपोलिस आयुक्तपदी संदीप कर्णिक यांची निवड

पुण्याच्या सहपोलिस आयुक्तपदी संदीप कर्णिक यांची निवड

पुणे, 21 एप्रिल 2022: राज्य गृह विभागाने काल संध्याकाळी राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. यानुसार पुण्याच्या सहपोलिस आयुक्तपदी संदीप कर्णिक यांची निवड करण्यात आलीय. यापूर्वी ते बृहन्मुंबईच्या पश्‍चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त म्हणून पदभार सांभाळत होते. तर, विद्यमान सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांची मुंबईच्या महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी नेमणूक करण्यात आलीय.

राज्य पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. यानुसार पुण्याच्या सहपोलिस आयुक्तपदी संदीप कर्णिक यांची निवड करण्यात आलीय. पोलिस उपमहानिरीक्षक पदाच्या दर्जावरुन विशेष पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या पदावर कर्णिकांना ही पदोन्नती देण्यात आलीय. तर पुण्याचे सह पोलिस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांची बदली करण्यात आलीय.

डॉ. रविंद्र शिसवे यांची पुणे सह आयुक्त पदावरून बदली झाली असून त्यांची नियुक्ती आता महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग मुंबई येथे विशेष पोलिस महानिरीक्षक म्हणून करण्यात आलीय.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

error: Content is protected !!
Exit mobile version