गोल पोस्ट क्रीडा टेनिस सानिया मिर्झा करणार पुनरागमन

सानिया मिर्झा करणार पुनरागमन

मुंबई: गेल्या काही वर्षांमध्ये सानिया मिर्झा खेळापासून दूर राहिले होती. मातृत्वा मुळे तिने काही दिवस खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता ती पुढील वर्षी पुनरागमन करत आहे.
भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झा मातृत्वा नंतर पुन्हा एकदा कोर्टवर उतरणार आहे. पुढील वर्षी जानेवारीत होबार्ट आंतरराष्ट्रीय स्पर्धेतून पुनरागमन करणार आहे. तिनेच ही बातमी दिली. चीन ओपन २०१७ स्पर्धेत खेळल्यानंतर ती कोर्ट पासून दूर होती. जागतिक क्रमवारीत सध्या दुहेरी ३८ व्या स्थानावर असणाऱ्या युक्रेनच्या नादिया कीचेनोकच्या साथीत ते दुहेरीची लढत खेळणार आहे. अर्थात त्यापूर्वी पुढील महिन्यात मुंबईत होणाऱ्या आय टी एफ स्पर्धेत खेळण्यासाठी चा प्रयत्न असेल या स्पर्धेत खेळण्याची शक्यता ५० टक्के असली तरी होबार्ट मध्ये आपण नक्की खेळणार असे तिने सांगितले.

error: Content is protected !!
Exit mobile version