गोल पोस्ट इतर राजकारण संजय गायकवाड यांचा थेट इशारा, CM विरोधात बोलाल तर चुन चुनके गिन...

संजय गायकवाड यांचा थेट इशारा, CM विरोधात बोलाल तर चुन चुनके गिन गिणके मारेंगे!

बुलढाणा, ४ सप्टेंबर २०२२ : एकनाथ शिंदे यांच्याविरोधात बोलाल तर चुन चुनके अन् गिन गिनके मारेंगे” अशी धमकी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी दिली. शनिवारी शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या सोहळ्याचं आयोजन होतं. यावेळी शिंदे गटातील काही कार्यकर्ते संजय गायकवाड यांच्या कार्यक्रमास्थळी येऊन आम्हीच शिवसेना असा दावा करत गोंधळ करत होते. या दरम्यान दोन्ही गट एकमेकांना भिडले. या घटनेमुळे या ठिकाणी काही काळ गोंधळाचं वातावरण पसरलं.

आमदार संजय गायकवाड या वेळी बोलतात की. “ठाकरे गटाचे पदाधिकारी आपली मर्यादा पातळी सोडून बोलत आहेत. पण त्यांना माहित नाही की संजय गायकवाड हा खरा शिवसैनिक आहे आणि माझे कार्यकरते किती भयानक आहेत. ठाकरे गट आम्हाला घरात घुसून मारण्याची धमकी देतात पण जर का ते मुख्यमंत्री शिंदे यांच्या विरोधात बोलले तर चुन चुनके आणि गिन गिनके मारेंगे.” असं बोलत त्यांनी थेट इशाराच दिला आहे.

काल बुलढाण्यात पदाधिकाऱ्यांच्या सत्कार सोहळ्याच्या वेळी झालेल्या हाणामारीमुळे तेथील वातावरण तापलं आहे आणि त्याचबरोबर शिवसेना आणि शिंदे गटातील वाद आता शिगेला पोहोचला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

error: Content is protected !!
Exit mobile version