गोल पोस्ट महाराष्ट्र सिल्लोडमध्ये संत रविदास महाराज सामाजिक सभागृहाचे लोकार्पण

सिल्लोडमध्ये संत रविदास महाराज सामाजिक सभागृहाचे लोकार्पण

सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर २५ फेब्रुवारी २०२४ : नगर परिषदेच्या माध्यमातून सिल्लोड शहरातील नर्सरी भागात नव्याने उभारण्यात आलेल्या संत रविदास महाराज सामाजिक सभागृहाचे लोकार्पण अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. तसेच नर्सरी जवळील नव्याने उभारण्यात आलेल्या संत रविदास महाराज सामाजिक सभागृह आणि शहरातील दुर्गामाता मंदिर रोड वरील संत रविदास महाराज नियोजित मंदिर परिसरात आयोजित अभिवादन कार्यक्रम प्रसंगी उपस्थित राहून संत रविदास महाराज यांना अभिवादन करत अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तार यांनी उपस्थितांना संत रविदास महाराज जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी सेवानिवृत्त प्राचार्य नामदेवराव चापे, नगराध्यक्षा श्रीमती राजश्री निकम, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, न.प.तील शिवसेना गटनेता नंदकिशोर सहारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्रीरंग साळवे, शिवसेना शहरप्रमुख मनोज झंवर, डॉ मच्छिद्र पाखरे, राजेंद्र ठोंबरे, नगरसेविका मालतीताई डोभाळ, नगरसेवक शंकरराव खांडवे, विठ्ठल सपकाळ, सुनील दुधे, रतनकुमार डोभाळ, बबलू पठाण, माजी नगराध्यक्ष पांडुरंग दुधे, हाजी मोहंमद हनिफ, कृष्णा लहाने,जगदीश बेदवे, , मुश्ताक देशमुख, कुणाल सहारे, सचिन साळवे, रवी गायकवाड, यांच्यासह किसन कटारे, प्रभाकर गायकवाड, रविराज कासोदे, राजेंद्र गायकवाड, सुखलाल बेडवाल, सुधाकर गायकवाड, चंपालाल लोधे, सुभाष लोखंडे, भागवत जाधव, संतोष गायकवाड, सुधाकर जाधव, राजू रोजेकर, रामलाल पवार आदींसह समाज बांधवांची उपस्थिती होती.

न्युज अनकट प्रतिनीधी : डॉ सचिन साबळे

error: Content is protected !!
Exit mobile version