गोल पोस्ट महाराष्ट्र खिर्डी खुर्द येथे अंत्योदय कार्ड धारक महिलांना साड्यांचे वाटप

खिर्डी खुर्द येथे अंत्योदय कार्ड धारक महिलांना साड्यांचे वाटप

खिर्डी खुर्द, जळगाव, २५ फेब्रुवारी २०२४ : खिर्डी खुर्द येथील स्वस्त धान्य दुकानामध्ये शासनाच्या कॅप्टिव्ह मार्केट योजना ‘एक रेशन कार्ड एक साडी मोफत’ या उपक्रम अंतर्गत अंत्योदय कार्ड लाभार्थींना आज साड्या वाटप करण्यात आल्या.

या प्रसंगी खिर्डी खुर्दचे सरपंच राहुलभाऊ फालक, उपसरपंच पुष्पाताई पाटील, खिर्डी खुर्दचे पोलीस पाटील प्रदीप श्रीराम पाटील, ग्रामपंचायत सदस्य राहुलभाऊ बढे, पवनभाऊ चौधरी, ग्रामपंचायत सदस्य जयश्री कोचूरे, कोतवाल अनंत कोळी, तत्पर फाउंडेशन अध्यक्ष गुणवंत पाटील, पत्रकार भिमराव कोचूरे, पत्रकार सादिक पिंजारी, पत्रकार कांतीलाल गाढे, पत्रकार शेख इद्रीसभाई, स्वस्त धान्य दुकानदार के. डी. तायडे, आदिसह अंत्योदय कार्ड धारक लाभार्थी महिला उपस्थित होत्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी : आत्माराम गायकवाड

error: Content is protected !!
Exit mobile version