गोल पोस्ट महाराष्ट्र पुणे सरकारी रुग्णालये आता अधिक सुरक्षित ३,०२५ सुरक्षारक्षक तैनात होणार

सरकारी रुग्णालये आता अधिक सुरक्षित ३,०२५ सुरक्षारक्षक तैनात होणार

डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवरील हल्ले रोखण्यासाठी तसेच रुग्णालयांची सुरक्षा वाढवण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता शासकीय रुग्णालयांमध्ये ३,०२५ नवीन सुरक्षारक्षक नेमले जाणार आहेत. ही भरती आउटसोर्सिंग पद्धतीने केली जाईल. या निर्णयामुळे जिल्हा रुग्णालये, सामान्य रुग्णालये, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांची सुरक्षा अधिक मजबूत होणार आहे.

विशेषतः आयसीयू, आपत्कालीन विभाग आणि प्रसूतिगृहांना अधिक प्राधान्य दिले जाईल. यासोबतच सीसीटीव्ही कॅमेरे वाढवणे, ओळखपत्राशिवाय प्रवेशबंदी आणि पोलिसांशी समन्वय साधून गस्त घालणे यांसारख्या उपाययोजनाही केल्या जाणार आहेत. या निर्णयामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होऊन रुग्णसेवा अधिक प्रभावी होईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी चैतन्य पगारे

error: Content is protected !!
Exit mobile version