गोल पोस्ट इतर राजकारण ‘सावरकरांना भारतरत्न म्हणजे भगतसिंगाचा अपमान’ कन्हय्या कुमार

‘सावरकरांना भारतरत्न म्हणजे भगतसिंगाचा अपमान’ कन्हय्या कुमार

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न द्यायचा म्हणजे भगतसिंगाचा अपमान आहे, असे वक्तव्य जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता कन्हैया कुमारने केले आहे.

कन्हैया कुमार हा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नगरमधील उमेदवार भैरवनाथ वाकळे यांच्या प्रचारासाठी नगर येथे आला होता. त्यावेळी त्याने हे वादग्रस्त वक्तव्य केले.

आता युवकांनी पुढे येऊन सक्षम पर्याय उभा केला पाहिजे. त्यासाठी आम्ही चळवळ करत आहोत. विरोधी पक्षातील अनेक नेते पदांसाठी भुकेलेले असून ते विचार सोडून सत्तेमध्ये सहभागी झाले आहेत, असा आरोपही त्याने यावेळी केला.
आता यावरून नवीन वादाला वाचा फुटते का ते पाहणे तितकेच महत्वाचं आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version