सायबर गुन्हेगारांनी आता ज्येष्ठांनाही लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. सोळू, खेड येथील ७० वर्षीय विठ्ठल निवृत्ती ठाकूर यांना मोबाइल हॅक करून २४ लाख ३५ हजार रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अज्ञात हॅकरने फिर्यादीच्या एचडीएफसी बँकेतील ७० लाख रुपयांची मुद्दल आणि ६ लाख ६३ हजार रुपयांचे व्याज बचत खात्यात ट्रान्सफर केले.
त्यानंतर अवघ्या दोन दिवसांत त्या खात्यातून २४ लाखांहून अधिक रक्कम वेगवेगळ्या खात्यांमध्ये वळती केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ठाकूर यांनी तातडीने आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी चैतन्य पगारे